मुंबई : राज्यातील महाविकासआघाडी सरकार संकटात आहे. शिवसेनेचे 39 आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आलं आहे. राज्यपाल विशेष अधिवेशन बोलवतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ठाकरे सरकारला यानंतर बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकारकडे बहुमत नसल्याने बहुमताची चाचणी घेण्यासाठी पत्र दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीतून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर लगेचच ते मुंबईत आले आणि राज्यपालांची भेट घेतली. दिल्लीत त्यांनी जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. भाजपची रननीती ठरल्यानंतर आता भाजप अॅक्शनमोडमध्ये आली आहे.


'शिवसेनेचे 39 आमदार बाहेर आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत त्यांना राहायचं नाही. त्यामुळे ठाकरे सरकारकडे बहुमत राहिलेलं नाही. त्यामुळे बुहमत सिद्ध करण्यासाठीचं पत्र आम्ही राज्यपालांना दिलं आहे. राज्यपाल योग्य तो निर्णय घेतील असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.


भाजपच्या शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेतली आहे. कायदेशीर बाबींची चाचपणी करुन भाजपने आता बहुमत सिद्ध करण्यासाठी आव्हान दिलं आहे. त्यामुळे आता ठाकरे सरकार बहुमत कसं सिद्ध करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.