Maharashtra Politics : देशात सध्या नवे शंकराचार्य तयार झाले आहेत.. त्याचं नाव मोदी (PM Narendra Modi) आहे अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलीय. देशात बीजेपीपीठ नावाचं नवीन पीठ तयार झाल्याचा टोलाही राऊतांनी (Sanjay Raut) लगावलाय.. मोदी जे करतील तेच होतंय अशी टीकाही राऊतांनी मोदींवर केलीय. पंतप्रधान मोदी यांनी कधीही पत्रकार परिषद घेण्याची हिंमत दाखवली नाही, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिंदे गटाला आव्हान
हिंमत असेल तर स्वत: चा पक्ष काढा आणि चालवून दाखवावा असं आव्हान संजय राऊत यांनी शिंदे गटाला (Shinde Group) दिलं आहे. दिल्लीच्या मदतीने पक्ष चोरायचे. राजकारणात पाकिटमारी करायची. हे कसलं राजकारण? ही तर नामर्दानगी असल्याचं संजय राऊत यांनी म्हटंलय. तसंच शिवसेनेच्या तिकीटावर निवडूण आलेले आमदार पैशाच्या जोरावर पळवायचे. कोर्टबाजी करायची पक्षावर दावा सांगायचा. हे तुमचं तुम्हाला लखलाभ. पण आम्ही या विरोधात लढत राहू, असंही संजय राऊत यांनी सांगितलंय.


शिवसेना पक्षावर दरोडा कसा टाकण्यात आला. या मागचं सत्य काय? यावर आज उद्धव ठाकरे महा पत्रकार परिषद घेणार आहेत. सत्य ऐका आणि विचार करा, ही आमची भूमिका आहे, अशी खुली पत्रकार परिषद घेण्याची हिंमत सराहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवावी, असं खुलं आव्हानही संजय राऊत यांनी दिलं आहे.


उद्धव ठाकरे करणार गौप्यस्फोट
उद्धव ठाकरे आज मोठी पत्रकार परिषद घेणार आहेत. उद्धव ठाकरेंची ही महापत्रकार परिषद असणारेय. दुपारी 4 वाजता वरळी स्पोर्टस कॉम्प्लेक्सच्या डोममध्ये ही पत्रकार परिषद घेण्यात येणारेय. नार्वेकरांनी निकाल देताना सर्व मर्यादा ओलांडल्यायत. त्यामुळे त्यांनी दिलेल्या निकालाची कायदेतज्ज्ञ, जनतेच्या उपस्थितीत चिरफाड करणार असल्याचा दावा राऊतांनी केलाय. आजची पत्रकार परिषद म्हणजे एक प्रकारे 'जनता न्यायालय' असेल. 'सत्य ऐकून विचार करा!' असं ठाकरे गटाकडून या पत्रकार परिषदेबद्दल सांगण्यात येतंय. त्यामुळे या पत्रकार परिषदेत काय गौप्यस्फोट करणार, याकडे लक्ष लागलंय. 


देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर
दरम्यान, मुर्खांना उत्तर देत नाही अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) संजय राऊतांवर पलटवार केलाय. राम मंदिर मंदिर कुठे बनलंय ती जागा जाऊन बघा.. वादग्रस्त जागेपासून 4 किलोमीटर दूर मंदिर बांधण्यात आल्याचा दावा राऊतांनी केला होता. त्यावरच उबाठा सेनेनं हिंदूंचा अपमान करणं बंद करावं असा सल्ला फडणवीसांनी दिलाय.


तर संजय राऊत वारंवार हिंदूंचा अपमान करतायेत. त्यांची सुरक्षा काढा, बाकीचं काम हिंदू करतील अशा शब्दात नितेश राणेंनी संजय राऊतांवर हल्ला चढवलाय. हिंदू विरोधकांना या देशात राहण्याचा अधिकार नाही असही नितेश राणेंनी म्हंटलंय.