Maharashtra Politics : सासुरवाडीत लागलेल्या बॅनरमुळे जावईबापू चिडले! मुख्यमंत्री पदाबाबत नेमकं काय म्हणाले अजित पवार
Maharashtra Politics : अजित पवारांनी मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा बोलून दाखवल्यानंतर, राज्यभरात अनेक ठिकाणी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचे बॅनर लागले आहेत. मुख्यमंत्री पदाबाबत अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पत्रकारांनी प्रश्न विचारला असता. अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे बनले याचे उदाहर देखील दिले आहे.
Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात सध्या एकच चर्चा सुरु आहे ती मुख्यमंत्री पदाची. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होणार अशा प्रकारची ही चर्चा आहे. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून सासूरवाडीत संत गोरोबा काकांना साकडं घालण्यात आलंय...तर धाराशिवच्या तेर गावातील चौकाचौकात "अजित पवार भावी मुख्यमंत्री" असे बॅनर लावण्यात आले आहेत. सासुरवाडीत लागलेल्या बॅनरमुळे जावईबापू चिडले आहेत. मुख्यमंत्री पदाबाबत अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
अजित पवारांनी मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा बोलून दाखवल्यानंतर, राज्यभरात अनेक ठिकाणी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचे बॅनर लागले आहेत. मुख्यमंत्री पदाबाबत अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पत्रकारांनी प्रश्न विचारला असता. अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे बनले याचे उदाहर देखील दिले आहे.
भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावू नका. बॅनर लावून काही फायदा होणार नाही. सासुरवाडीत माझ्यावर प्रेम ऊतू चाललंय असं दिसतंय. मुख्यमंत्री पदासाठी 145चा आकडा लागतो. तो आमदरांची संख्या वाढल्याशिवाय गाठता येणार नाही. एकनाथ शिंदे यांनी यांनी डोकं लावून हा आकडा गाठला आणि मुख्यमंत्री झाले असा टोला अजित पवार यांनी लगावला.
बारसू आंदोलनाबाबत काय म्हणाले अजित पवार
परिसरातील कायमचे नुकसान होणार असेल तर विरोध नक्की करा पण त्यातून जर फायदा होणार असेल तर त्याचा विचार करायला हवा. पर्यावरणाचा रास होणार नसेल, त्या ठिकाणी असलेले जन जीवन जर परिणाम होणार नसेल जे विरोध करत आहेत त्यांना विश्वासात घ्यायला हवं. अनेक प्रकल्प बाहेर गेले आहेत. ज्यांच्या जमिनी आहेत त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे. काही लोकांनी परराज्यातल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या नाही परराज्यातल्या पण लोकांनी तिथे जमिनी घेतल्यात असं पण कानावर येत त्याच्याबद्दलची सगळी शहानिशा करावी आणि स्थानिक लोकांना जर फायदा होणार असेल तर तो स्थानिक लोकांचा व्हावा आणि नुकसान होणार असेल पर्यावरणाचा ऱ्हास होणार असेल तर त्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये फेरविचार व्हावा असे अजित पवार म्हणाले.
असे प्रकारचे प्रसंग उद्भवतात ते संवेदनशील मार्गाने सोडवायचे असतात राज्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घ्यायचा असतो त्याच्यांत बैठका घ्यायच्या असतात बैठकीला त्या लोकांना त्यांचा विरोध आहे त्यांना बोलवायचा असतं आणि चर्चा करायची असते. माझ्या माहितीप्रमाणे शासनाच्या वतीने कलेक्टर एसपी हे काम करताय आणि तिथं स्वतः पालकमंत्री देखील लक्ष ठेवून आहे परवा पवार साहेबांचा आणि एकनाथराव शिंदे साहेबांचा पण फोनवर संभाषण झालं त्यावेळेस पवार साहेबांना आजपर्यंत 55 वर्षाचा जो राजकीय मोठा अनुभव आहे त्यांची कारकीर्द मोठी आहे त्याला अनुसरून त्यांनी पण काही त्यांना सूचना केल्या आहेत.