Maharashtra Rain Update : मुंबईत गुरुवारी जोरदार पावसाचा अंदाज, हवामान खात्याचा इशारा
9 जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज, तर 9 जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागानं (Imd) दिलाय.
मुंबई : राज्यातील 18 जिल्ह्यांत पुढील चार दिवस जोरदार पाऊस (Maharashtra Rain Forcast) बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. 9 जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज, तर 9 जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागानं (Imd) दिलाय. शनिवारनंतर मात्र, पाऊस ओसरणार असल्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवलीय. (maharashtra rain update forecast of heavy rain for 4 days in state meteorological department alerts 18 districts)
या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाकडून सातारा,कोल्हापूर, रत्नागिरी आणि नाशिकला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर जिल्ह्याला पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट असणार आहे.
मुंबईकरांसाठी गुरुवार महत्त्वाचा
मुंबईरांसाठी गुरुवारचा दिवस पावसाबाबत अतिशय महत्त्वाचा असणार आहे. मुंबईसह ठाण्यालाही ऑरेंज अर्लट देण्यात आला आहे. तसेच पुण्यात आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.