Rajyasabha Election : राज्यसभेची सहावी जागा अपक्ष म्हणून लढवण्याची संभाजीराजे छत्रपतींची (Sambhajiraje Chhatrapati) इच्छा आहे. मात्र शिवसेनेनं संजय राऊत (Sanjay Raut) आणि संजय पवार (Sanjay Pawar) असे आपले दोन्ही उमेदवार जाहीर केले आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीनं (Mahavikas Aghadi) पाठिंबा जाहीर न केल्यानं संभाजीराजेंची कोंडी झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानं मराठा संघटनांमध्ये नाराजी पसरली आहे. संभाजीराजेंनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेच्या वतीनं आता एक पोस्टर व्हायरल होतं आहे. आता राज्यसभा नव्हे, तर संपूर्ण राज्यच घेणार! इतिहासाची पुनरावृत्ती, महाराष्ट्रात स्वराज्याची निर्मिती असा उल्लेख त्या पोस्टरवर आहे. 2024 ची विधानसभा निवडणूक हे लक्ष्य असेल, असा सूचक इशाराही राजे समर्थकांनी दिलाय..


संभाजीराजेंच्या राज्यसभेच्या वाटेतील काटे भविष्यात सत्ताधारी महाविकास आघाडीला आणि शिवसेनेला अडचणीत आणू शकतात, अशी चर्चा आहे...


मराठा मतांचं नुकसान होणार?
संभाजीराजे मराठा समाजात लोकप्रिय आहेत. त्यांना उमेदवारी नाकारल्यानं आगामी निवडणुकांमध्ये मराठा समाजाचा रोष शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला अडचणीचं ठरू शकतं


छत्रपती घराण्याला डावलल्याचा ठपका
शिवसेना आणि मविआनं संभाजीराजेंना तिकीट नाकारलं नाही.  तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी गद्दारी केली, असा ठपका मराठा संघटनांकडून ठेवला जाऊ शकतो...


मराठा आंदोलन पेटणार?
मराठा आरक्षणामुळं आधीच सरकार कोंडीत सापडलंय... सरकारला अडचणीत आणण्यासाठी पुन्हा मराठा आंदोलन पेटण्याची शक्यता आहे.


स्वराज्य पक्षाची स्थापना?
संभाजीराजेंनी स्वराज्य संघटनेची स्थापना केलीय... राज्यभरात संघटनेची बांधणी करून ते निवडणुकीच्या राजकारणात उतरून राजकीय पक्षांची अडचण करू शकतात...


संभाजीराजेंना उरणचे अपक्ष आमदार महेश बालदी यांनी सर्वात आधी पाठिंबा दिला. आता मनसेचे एकमेव आमदार राजू रतन पाटील यांनीही ट्विट करून राजेंच्या उमेदवारीसाठी पुढाकार घेतलाय. पण 42 आमदारांचा पाठिंबा मिळणं अवघड असल्यानं संभाजीराजेंची राज्यसभेची वाट सध्या तरी अशक्यच मानली जातेय.