Coronavirus: राज्यात कोरोनाचे ११८५२ नवे रुग्ण; १८४ जणांचा मृत्यू
आज दिवसभरात ११,१५८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
मुंबई: गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे ११८५२ नवे रुग्ण आढळून आले. तर उपचार सुरु असलेल्या १८४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७,९२,५४१ इतकी झाली आहे. यापैकी १,९४,०५६ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर एकूण मृतांचा आकडा २४५८३ वर जाऊन पोहोचला आहे.
राज्य सरकारकडून अनलॉक-४ ची नियमावली जाहीर, पाहा काय सुरू होणार
गेले दोन दिवस महाराष्ट्रात प्रत्येकही १६ हजाराहून अधिक रुग्ण सापडले होते. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या तुलनेत आज नव्या कोरोना रुग्णांची संख्या घटली. राज्यात एकीकडे करोना रुग्ण बरे होण्याची स्थिती समाधानकारक असली तरी दर दिवसाला वाढणाऱ्या रुग्णांची संख्यांही अधिक आहे.
ठाकरे सरकारचा लोकांच्या जीवाशी खेळ; मुख्यमंत्री सहायता निधी तिजोरीतच पडून
आज दिवसभरात ११,१५८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत अंशतः वाढ झालेली असून हा आकडा आता ७२.०४ वरुन ७२.३७ टक्क्यांवर येऊन ठेपल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन दिली.
याशिवाय, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४१ लाख ३८ लाख ९२९ चाचण्यांपैकी ७ लाख ९२ हजार ५४१ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर बाकीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात १३,५५, ३३० व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ३५,७२२ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.