Maharashtra State Co operative Bank Job: बॅंक भरती परीक्षांची तयारी करताय? बॅंकेसंबंधी कामाची आवड आहे? पदवीपर्यंतच शिक्षण झालंय? मग तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँकेत तुम्हाला नोकरीची संधी मिळू शकते. यासाठी बॅंकेच्या अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँके भरती अंतर्गत असिस्टंट इंटर्नची पदे भरली जाणार आहेत. बॅंकेत असिस्टंट इंटर्नच्या एकूण 32 रिक्त जागा आहेत. या रिक्त जागा भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना मुंबईत नोकरी करत या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.


शैक्षणिक पात्रता


असिस्टंट इंटर्न पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून एमबीए केलेले असावे. मॅनेजमेंटमधील 2 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा असलेले उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. कोऑपरेटीव्ह, अॅग्री बिझनेस,रुरल डेव्हलपमेंट यातील शिक्षण असणाऱ्यास प्राधान्य असेल.  उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षे च्या दरम्यान असावे.


हेही वाचा: 145 कोटींची नोकरी सोडत उभारली 8300 कोटींची कंपनी, महिलेची प्रेरणादायी कहाणी


कुठे पाठवाल अर्ज?


इच्छुक आण पात्र उमेदवारांनी आपले अर्ज 'व्यवस्थापक (OSD) HRD&M विभाग, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, सर विठ्ठलदास ठाकरसे मेमोरियल बिल्डिंग, 9, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई- 40001 या पत्त्यावर पाठवायचे आहेत. 


हेही वाचा: बारावी ते पीएचडीपर्यंत मुलींना मिळते शिष्यवृत्ती! पात्रता, अर्ज प्रक्रिया सर्वकाही जाणून घ्या


महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँक लिमिटेड मुंबई यांची अधिकृत वेबसाईट https://www.mscbank.com/ वर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.


अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा


 


हेही वाचा: रस्त्याशेजारी करता येणारे 10 व्यवसाय, कराल 50 हजारपर्यंत कमाई