बारावी ते पीएचडीपर्यंत मुलींना मिळते शिष्यवृत्ती! पात्रता, अर्ज प्रक्रिया सर्वकाही जाणून घ्या
Girls scholarships: शिक्षण मंत्रालयाने नुकताच ऑल इंडिया सर्व्हे हायर एज्युकेशन म्हणजेच एआयएएचई अहवाल प्रसिद्ध केला. यानुसार मागील वर्षांच्या तुलनेत 2021-22 या शैक्षणिक वर्षात उच्च शिक्षण अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलींची संख्या सर्वाधिक होती.
Girls scholarships: या काळात 2 कोटींहून अधिक मुलींनी उच्च शिक्षणासाठी नावनोंदणी केली होती. हे एकूण प्रवेशाच्या 48% होते. तर 2014-15 पासून आत्तापर्यंत उच्च शिक्षणात मुलींच्या प्रवेशात 32% वाढ झाली असल्याचेही या अहवालातून समोर आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या अहवालानुसार, 2020 मध्ये 82 लाख भारतीय विद्यार्थी परदेशात शिक्षण घेत होते. यापैकी 49% म्हणजे जवळपास निम्म्या मुली होत्या.