मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इकॉनॉमिक ऑफेन्स विंगच्या एसआयटीने अजित पवार यांच्यासह ७६ जणांना क्लीनचीट दिली आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात २५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिखर बँकेच्या २५ हजार कोटी रूपयांच्या कथित घोटाळ्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अजित पवार यांच्यासह ७६ जणांना क्लीनचीट दिली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून न्यायालयालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. २५ हजार कोटी रूपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी चौकशी अहवालात तत्कालिन संचालक मंडळावर ठपका ठेवण्यात आला होता.


त्यानंतर २०११ मध्ये रिझर्व्ह बँकेनं बर्खास्त केलेल्या संचालक मंडळात अजित पवार, हसन मुश्रीफ यांसह बड्या नेत्यांचा समावेश होता. या कथित घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांच्यासह ७० जणांवर कलम ४२०, ५०६, ४०९, ४६५ आणि ४६७ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. यामध्ये शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ, भाजपात असलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांसह अन्य पक्षातील नेत्यांच्या नावाचा समावेश होता.