मुंबई : राज्यातल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी राज्य सरकारने नवीन हेलिकॉप्टर विकत घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सिर्कोस्की कंपनीचे S76-D हे हेलिकॉप्टर सुमारे १२७ कोटी रुपयांना विकत घेतले जाणार आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने हा निर्णय गेल्या महिन्यात घेतला होता. मंगळवारी म्हणजे काल  याबाबत शासन निर्णयाद्वारे हेलिकॉप्टर खरेदीचा निर्णय अखेर जाहीर करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या वर्षी मे महिन्यात लातूर इथे मुख्यमंत्री यांचे हेलिकॉप्टत दुर्घटनाग्रस्त झाले होते. तपासानंतर ते दुरुस्तीच्या पलीकडे गेल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे नवीन हेलिकॉप्टर विकत घेईपर्य़ंत पुढील काही दिवस मुख्यमंत्र्यासह राज्यातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या शासकीय दौ-यासाठी भाड्याने घेतलेले हेलिकॉप्टर वापरले जात होते. असं असतांना जुलै महिन्यांत मुख्यमंत्री रायगड जिल्ह्यात भाड्याने घेतलेल्या हेलिकॉप्टरमध्ये बसत असताना अचानक हेलिकॉप्टर सुरु झाले होते. सुदैवाने तेव्हा कोणतीही दुर्घटना घडली नाही.



तेव्हा आता लातुर दुर्घटनेनंतर जवळपास एक वर्षांनी आता राज्य सरकारने नवीन हेलिकॉप्टर खरेदीचा निर्णय घेतला आहे. असं असलं तरी पुढील महिन्यापासून पावसाळा सुरू होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून या काळांत हेलिकॉप्टरचा फारसा वापर केला जाणार नाहीये. त्यातच नवीन हेलिकॉप्टर प्रत्यक्ष राज्यात दाखल होईपर्यंत काही काळ लागणार आहे. तेव्हा नव्या हेलिकॉप्टरचा प्रत्यक्ष वापर सुरू व्हायला पावसाळा संपेपर्यंत वाट बघावी लागणार आहे. हेलिकॉप्टरची क्षमता १३ प्रवासी वाहून नेण्याची आहे.