Sameer Wankhede: समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेतून शिंदे गटाच्या वतीनं ते निवडणूक लढणार असल्याचं म्हटलं जात आहे. सूत्रांच्या यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. असे झाल्यास समीर वानखेडे यांच्यासमोर धारावी मतदारसंघातून मुंबई कांग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या बहिणीचं त्यांना आव्हान असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2010 मध्ये महाराष्ट्र सेवा कर विभागात कार्यरत असताना, समीर वानखेडे यांनी करचुकवेगिरीप्रकरणी 2500 लोकांवर कारवाई केली होती. यामध्ये 200 हून अधिक बॉलीवूड लोकांचा सहभाग होता. ज्यामध्ये अनेक मोठ्या व्यक्ती होत्या. त्यानंतर त्यांनी महसूल विभागाला 87 कोटी रुपयांचा नफा दिला होता.


2 ऑक्टोबर 2021 रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली होती. यावेळी नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोने शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज केस प्रकरणात अटक केली होती. याप्रकरणा 25 लाखाची वसूली केल्याचा आरोप वानखेडेंवर लावण्यात आला होता. या प्रकरणामुळे समीर वानखेडे वादात सापडले होते.