नवी मुंबई: राज्यात इतक्यात मध्यावधी निवडणुका लागतील, असे वाटत नाही. तसे झाले तरी त्यासाठी आणखी काही काळ जावा लागेल, असे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केले. ते शनिवारी नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या राज्यव्यापी अधिवेशनात बोलत होते.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी त्यांनी म्हटले की, महाविकास आघाडी ही अंतर्गत मतभेदामुळे तुटेल. या सरकारमध्ये काही गोष्टींवर मतभेद आहेत. हे मतभेद आता उघड होऊ लागले आहेत. त्यामुळे तिढा वाढून हे सरकार मोडेल, पण राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले. 


हिंमत असेल तर निवडणुका लढवा - चंद्रकांत पाटील


यावेळी खडसे यांनी आपण अजूनही भाजपमध्येच असल्याचाही उल्लेख केला. मी पक्षातच आहे, सक्रीय आहे. पक्षातील एखाद्या व्यक्तीवर मी टीका जरूर केली असेल, पण पक्षावर कधीही टीका केली नाही, असे खडसे यांनी म्हटले. 


भाजपच्या राज्यव्यापी अधिवेशनाला संबोधित करताना खडसे यांनी अशाप्रकारचे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळाचे कान टवकारले आहेत. भाजपचे नेते सातत्याने महाविकासआघाडीचे सरकार कोसळून भाजप पुन्हा सत्तेत येईल, असे दावे करत असतात. 


काही दिवसांपूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेले एक वक्तव्यही चांगलेच गाजले होते. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सरकार पडेल, अशी वक्तव्ये करणे थांबवायला सांगितले आहे. आम्हाला सरकार पाडण्यात कोणताही रस नाही. ते आपापसातील मतभेदांमुळेच पडेल. त्यामुळे भाजप आता मध्यावधी निवडणुकांसाठी तयारी सुरु करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.