Dhananjay Munde : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. राज्यात शक्ती कायदा (Shakti Law) मंजूर झाला आहे, पण सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरुन महिलांवर अत्याचार होत आहेत, धनंजय मुंडे हे मंत्री पदाचा गैरवापर करत असून खोट्या या तक्रारी करून आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धनंजय मुंडे हे 10 मोबाईल क्रमांक वापरतात, त्यांचे अनेक मुलींशी अनैतिक संबंध असल्याचा गंभीर आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे. मी मी त्यांची पहिली पत्नी आहे तरीही धंनजय मुंडे यांनी न्यायालयात आम्ही केवळ रिलेशनशिपमध्ये राहत होतो असं सांगितलं, 4 मुलांना जन्म देऊन आम्हाला रस्त्यावर आम्हाला सोडून दिल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे. 


मंत्री पदाचा सर्वात जास्त गैरफायदा धंनजय मुंडे घेत आहेत. धंनजय मुंडे जमीन बळकावतात, निधन झोलेल्या व्यक्तीने यांच्या नावे जमीन केल्याची कागदपत्रं ते दाखवतात पण ती सगळ खोटी आहेत, महाविकास आघाडी धनंजय मुंडे यांना पाठीशी घालत आहे, सरकार शक्ती कायदा का पाळत नाही असा सवाल करुणा शर्मा यांनी उपस्थित केला आहे. 


माझी बहिण रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे यांचे देखील संबंध होते. याचे पुरावे रेणू शर्मा देणार होती, पण ते पुरावे नष्ट करण्यासाठी रेणू शर्माचा मोबाईल, लॅपटॉप पोलिसांनी जप्त करत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे यांची नार्को टेस्ट करावी, त्यात सत्य समोर येईल असं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे.  2008 मध्ये आईने विष खाऊन आत्महत्या केली कारण आईला धंनजय मुंडे यांनी त्रास दिल्याचा आरोपही करुणा शर्मा यांनी केला आहे. तर भावाला खूप त्रास दिल्याने त्याला ब्रेन हॅमरेज झाल्याचं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे.


धनंजय मुंडे यांनी खंडणीचा आरोप करुन माझ्या बहिणीला तुरुंगात टाकलं,  रेणू शर्मा धनजंय मुंडेबाबत मोठा खुलासा करणार होती. मात्र, त्यापूर्वीच तिला पोलिसांनी खोट्या आरोपाखाली अटक केली असल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे. बहिणीला धंनजय मुंडे एका व्यक्तीच्या द्वारे पैसे पाठवत आहेत ते का पाठवत आहेत ? असा सवाल करुणा शर्मा यांनी उपस्थित केला आहे.