मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी आवराआवर करुन बसलेल्या चाकरमन्यांना गुरुवारी राज्य सरकारच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला. सरकारने गणेशोत्सवाच्यादृष्टीने ११ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर या काळात कोकणातील प्रवास टोलमुक्त केला आहे. कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांनाही ही मुभा देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. 


या निर्णयामुळे चाकरमनी चांगलेच सुखावले आहेत. तसेच टोलसाठी लागणाऱ्या रांगा नसल्याने गणेशोत्सवाच्या काळात निर्माण होणारा वाहतूक कोंडीचा प्रश्नही काही प्रमाणात सुटणार आहे.