`म्हणून 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंद`, शरद पवार यांनी सांगितलं कारण... लोकांना आवाहन
Maharashra Band : बदलापूरमध्ये एका शाळेत दोन चिमुकलींवर झालेल्या लैगिंक अत्याचाराविरोधात राज्यात संतापाचं वातावरण आहे. बदलापूर अत्याचार घटनेविरोधात महाविकास आघाडीने शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
Maharashtra Band : बदलापूर अत्याचार घटनेविरोधात महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) शनिवारी म्हणजे 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची (Maharashtra Band) हाक दिली आहे. यावरून आज शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पत्रकार परिषद घेऊन सरकारचा समाचार घेतलाय. उद्याचा बंद जनतेचा उद्रेक आणि राग व्यक्त करण्यासाठी आहे. नागरिकांनी शांततेनं बंद पाळावं, असं आवाहन शरद पवारांनी केलंय. तर उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेला केलंय. हा बंद संस्कृती विरुद्ध विकृती असल्याचंही उद्धव टाकरेंनी म्हटलंय. तर सरकारनं उद्याच्या बंदवेळी जनतेला जेलमध्ये टाकून दाखवावं, असं आव्हान नाना पटोले यांनी केलंय.
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. विषय बदलापूर पुरता मर्यादित नाही. अनेक गोष्टी होत आहेत, मुलींवर अत्याचार, बालिकांवर अत्याचार होत आहेत. या घटना वाढत आहेत. लोकाच्या मनात राग आहे उद्रेक आहे, संघर्षाची भूमिका घेण्याऐवजी एक दिवसाचा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रश्नांची आस्था असलेला प्रत्येक घटक यात सहभागी व्हावा. शांततेच्या मार्गाने बंद पाळला जाणार आहे, असं शरद पवार यांनी म्हटलंय. तर बदलापूर प्रकरण धक्का देणारी घटना आहे. याचे पडसाद अनेक ठिकाणी उमटले आहेत. कठोर कारवाई झाली पाहिजे. राज्य सरकारने सतर्क राहून कठोर भूमिका घेतली पाहिजे असंही पवार यांनी सांगितलं.
पोलिस दलाने अधिक संवेदनशीलतेने काम केलं पाहिजे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर खटले दाखल करण योग्य नाही. गृहखात्याने संवेदनशील व्हावे.या घटना वाढत आहेत, थाबत नाही. कायदा सुव्यवस्था यंत्रणा जागरूक करावी लागेल. कोणाला दोष देत नाही. सगळ्यांनी शांततेत काम करावं असंही शरद पवारांनी म्हटलंय.
शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना उत्तर
बदलापूरचं आंदोलन राजकीय प्रेरित होतं या मुख्यमंत्र्यांच्या आरोपाचा शरद पवारांनी समाचार घेतलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे विधान करायला नको होतं, असं उत्तर शरद पवारांनी शिंदेंना दिलंय. बदलापूरचं आंदोलन राजकीय प्रेरित होतं, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला होता. याला शरद पवारांनी आज दिलंय. कोणता पक्ष आंदोलनात होता, असा सवाल त्यांनी शिंदेंना केलाय.
बंद विरोधात हायकोर्टात
विरोधकांनी पुकारलेला बंद बेकायदेशीर आहे. कुणालाही अश्याप्रकारे बंद पुकारण्याचा अधिकार नसल्याचं सरकारकडून सांगण्यता आलंय. बंद करणाऱ्या आंदोलकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असं सरकारकडून हाय कोर्टाला सांगण्यता आलंय. उद्याच्या महाराष्ट्र बंद विरोधात गुणरत्न सदावर्तेसह इतरांनी याचिका दाखल केलीय. त्याविरोधात सुनावणी सुरू आहे..