राज्याच्या तिजोरीत खडखडाट; मंत्री, बाबूंना दुबई वारीचे वेध
Minister`s visit to Dubai : राज्यातल्या मंत्री, बाबूंना दुबईचे वेध लागले आहेत.
मुंबई : Minister's visit to Dubai : राज्यातल्या मंत्री, बाबूंना दुबईचे वेध लागले आहेत. राज्याची तिजोरी खाली असताना कोट्यवधी निधी मंजूर करण्यासाठी मंत्री, बाबूंची धडपड दिसून येत आहे. दुबईला जाण्यासाठीचे मुख्यमंत्री कार्यालयात अर्जांचा पाऊस पडला आहे. 6 मंत्री, 54 अधिकारी दुबईवारीवर जाण्याच्या तयारीत आहेत. दुबई एक्स्पोत जाण्यासाठी विनंती अर्ज करण्यात आले आहेत. (Mahavikas Aghadi government Minister's visit to Dubai)
राज्यातली जनता महागाईत होरपळत असताना राज्यातल्या मंत्री, बाबूंना दुबई वारीचे वेध लागले आहेत. तब्बल अर्धा डझन मंत्री आणि 54 अधिकारी दुबईत जाण्याची तयारी करीत आहेत. दुबईत होणाऱ्यात एक्स्पोत जाण्याची परवानगी मागणाऱ्या विनंती अर्जांचा मुख्यमंत्री कार्यालयात खच दिसून येत आहे. काही मंत्री परदेशात रवाना झाले आहेत. तर त्यांच्या त्यांच्या खात्यातील 54 अधिकाऱ्यांनी त्यासाठी विनवणी केली आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र यावर विशेष नाराज असल्याचे कळत आहे. ही संख्या आटोक्यात आणावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा केल्याचे समजते आहे. सरकारी खर्चानेच हे सगळे वऱ्हाड दुबईला जाणार आहे. दौऱ्यासाठी 24 कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करावा यासाठी या मंत्री आणि अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री कार्यालय, मुख्य सचिव आणि थेट केंद्र सरकारला गळ घातली आहे.