महाविकास आघाडीचा खातेवाटप - पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला
मुख्यमंत्र्यांच्या अंतिम निर्णयानंतर आज खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता
मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीच्या खातेवाटपाचा तिढा सुटला असून, आज दुपारनंतर हा फॉर्म्युला जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे. काल दीर्घ काळ चाललेल्या चर्चेनंतर शिवसेनेच्या कोट्यातून काँग्रेसला सांस्कृतिक कार्य, बंदरे आणि खार भूमी विकास तर राष्ट्रवादी काँग्रेसला युवक कल्याण आणि क्रीडा ही खाती देण्यात येणार आहे... तर ज्या पक्षाचे आमदार जास्त असतील त्यांना त्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळणार आहे.
त्यानुसार १३ जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद शिवसेनेकडे, राष्ट्रवादीकडे १२ तर काँग्रेसकडे ११ जिल्ह्यांचं पालकमंत्रिपद असणार आहे. पालकमंत्रिपदासाठी तीन ते चार जिल्ह्यावर तीनही पक्षांनी दावा ठोकलाय, त्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घ्यावा असा निर्णय बैठकीत घेण्यात आलाय.
याशिवाय काँग्रेस, राष्ट्रवादीला आणखी एक जादा खातं हवं, मात्र त्याबाबत सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, आता चर्चा होणार नाही, अशी तीनही पक्षांनी भूमिका घेतलीय.
प्रमुख महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातील मंत्र्यांच्या खातेवाटपाची यादी तयार असून, दुपारनंतर दोन्ही पक्ष मुख्यमंत्र्यांकडे यादी सादर करणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अंतिम निर्णयानंतर खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. खातेवाटपाचा 'फॉर्म्युला झी २४ तास'च्या हाती लागलाय.
कसा असेल सत्तावाटणीचा फॉर्म्युला
कसं असेल महाविकासआघाडीचं खातेवाटप आणि पालकमंत्रिपदाचा फॉर्म्युला पाहुयात...
- जिल्ह्यात ज्या पक्षाचे जास्त आमदार त्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद त्या पक्षाकडे
- यानुसार १३ जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद शिवसेनेकडे, राष्ट्रवादीकडे १२ आणि काँग्रेसकडे ११ जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद
- प्रमुख जिल्ह्यामध्ये नागपूर, अमरावती काँग्रेसकडे नाशिक, पुणे राष्ट्रवादीकडे
- औरंगाबाद, मुंबई शिवसेनेकडे
- तीन ते चार जिल्ह्यावर तीनही पक्षांनी दावा ठोकलाय, त्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घ्यावा असा निर्णय
- याशिवाय काँग्रेस, राष्ट्रवादीला आणखी एक जादा खातं हवं, मात्र त्याबाबत सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, आता चर्चा होणार नाही, अशी तीनही पक्षांची भूमिका
- तीनही पक्षांच्या मंत्र्यांच्या खाते वाटपाची यादी तयार आहे, दुपारनंतर संबंधित पक्ष मुख्यमंत्र्यांकडे सादर करतील
शुक्रवारी दुपारनंतर केव्हाही खातेवाटप जाहीर होऊ शकेल.