मुंबई : येत्या शैक्षणिक वर्षापासून देशभरातल्या एमबीबीएस अभ्यासक्रमात महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. मेडिकल काऊंसिल ऑफ इंडियानं नविन अभ्यासक्रमाचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडे सुपूर्द केलाय. 


हे विषय होणार सामाविष्ट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानुसार एमबीबीएस विद्यार्थ्यांना आता संवाद कौशल्य, स्त्री पुरुष समानता, डॉक्टरांची नैतिकता, रुग्णांचे हक्क असे विविध विषय शिकावे लागणार आहेत. रुग्णांशी कसं बोलावं, संवेदनशीलता कशी बाळगावी, उपचार करताना स्त्री पुरुष भेदभाव करू नये, डॉक्टरांची नैतिक जबाबदारी काय? रुग्णांचे हक्क कोणते? अशा अनेक नवीन विषयांचा समावेश आता थेट अभ्यासक्रमात केला जाण्याचा प्रस्ताव आहे. 


नुकतीच याबाबत दिल्लीत बैठक पार पडली असून लवकरच या प्रस्तावाला मान्यता मिळणार असल्याची चिन्हं आहेत. रुग्णालयात डॉक्टर आणि रुग्ण तसंच रूग्णांचे नातेवाईक यांच्यात होणारे वाद कमी करण्यासाठी हा प्रयत्न आहे. रुग्णांना चांगली सेवा देताना भविष्यात डॉक्टरांनी अधिक संवेदनशीलपणं काम करावं, असा उदात्त हेतू यामागं आहे.