कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनेता अक्षय कुमारला दिलेल्या मुलाखतीत खासगी आयुष्यातील हितसंबंधाना उजाळा दिला होता. राजकारणाच्या पलिकडे आपले सर्व नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. याचे स्पष्टीकरण देताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे उदाहरण पंतप्रधानांनी दिले. ममता बॅनर्जी या कडवा राजकीय विरोध करत असल्या तरीही दरवर्षी न चुकता मला कुर्ता आणि मिठाई पाठवतात असे मोदी म्हणाले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता ममता बॅनर्जींनी पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्याला उत्तर दिले आहे. मी अनेक प्रसंगी अनेकांना मिठाई पाठवली असेल पण त्यांना मत देणार नाही असे ममता म्हणाल्या. हुगली जिल्ह्यातील प्रचार सभेत त्या बोलत होत्या. मी लोकांना रसगुल्ला पाठवते, पुजेदरम्यान उपहार पाठवते आणि चहा पाजते पण मी त्यांना एकही मत देत नाही असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. 



बांगलादेशचा पंतप्रधान हसीना शेख या मला दरवर्षी ढाकातून खास मिठाई पाठवायच्या. माझ्या कट्टर विरोधकांमध्ये असलेल्या ममता बॅनर्जी यांना याबद्दल कळाले तेव्हापासून त्या स्वत: माझ्यासाठी कुर्ता निवडतात आणि दरवर्षी उपहार पाठवतात असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. या अशा वक्तव्याने लोकसभा निवडणुकीत कदाचित मला नुकसान होऊ शकते असेही पंतप्रधान मोदी म्हणाले होते.