मुंबई :  मुंबईतल्या जोगेश्वरीतअतिशय(Jogeshwari)  धक्कादायक प्रकार घडला आहे. लग्नाला नकार दिल्यामुळे प्रेयसीला पेट्रोल (Petrol Burn)  टाकून जिवंत जाळलं आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पश्चातापानंतर प्रेयसीला वाचवताना प्रियकराचाही मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील जोगेश्वरीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याच्या प्रयत्नात असताना प्रियकरालाच आग लागली. यात प्रियकराचा शनिवारी जळून मृत्यू झाला आहे. तर प्रेयसीला उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  मात्र उपचारादरम्यान तिचाही मृत्यू  झाला.



  


विजय खांबे असे मृत तरूणाचे नाव आहे. तर नीलिमा पासकळे असे तरुणीचे नाव आहे. विजयचे नीलिमासोबत  प्रेम संबंध होते.  यासाठी विजयच्या कुटुंबियांनी नीलिमा च्या घरच्यांना लग्नाचा प्रस्ताव दिला होता. मात्र नीलिमाच्या कुटुंबियांनी लग्नास नकार दिला. यामुळे व्यथित झालेल्या विजयने दारुच्या नशेत नीलिमाला पेटवून दिलं. मात्र नंतर त्याला पश्चाताप झाल्यामुळे त्यानं तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरु आहे.