COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : राज्याचीच नव्हे तर देशाची जनता ज्याची आतुरतेनं वाट पाहतेय तो मान्सून पुढच्या ४८ तासांत गोव्यासह कोकणात दाखल होण्याची दाट शक्यता आहे. कुलाबा वेध शाळेनं हा अंदाज वर्तवला आहे. तमाम महाराष्ट्र ज्याची आतुरतेनं वाट पाहातोय, तो पाहुणा सध्या महाराष्ट्राच्या वेशीपर्यंत येऊन थांबलाय. सध्या मान्सून गोव्याजवळ पोहोचलाय. पण महाराष्ट्रात प्रवेश करायला तो आणखी दोन दिवस घेणार आहे.


६ जूनला मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज आहे.
पण कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पुढचे दोन दिवस मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावेल. तर पुढच्या ३६ तासांत राज्यात गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे बळीराजाने आपल्या पिकांची काळजी घ्यावी. रायगड आणि पश्चिम महाराष्ट्रात गारपीट होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. तर दक्षिण कोकण आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.