मुंबई : अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या मालकाचा  मृतदेह सपडल्यामुळे या  प्रकरणातील गुढ वाठलं आहे. रिलायन्स उद्योग समूहाचे मालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्याघरासमोर स्फोटकांनी भरलेली जी गाडी सापडली होती, त्या गाडीच्या मालकाची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पण आता ही हत्या होती की  आत्महत्या असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, मनसुख कालपासून बेपत्ता होते, म्हणून त्यांच्या त्यांच्या कुटुंबियांनी आज दुपारी नौपाडा पोलीस ठाण्यात ते बेपत्ता (Hiren mansukh missing) असल्याची तक्रार दाखल केली होती. पण त्यांचा आज मृतदेह सापडल्याने मोठा खळबळ उडाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याप्रकरणी अनेक जण प्रतिक्रिया देत आहेत. मनसुख आत्महत्या करू शकत नाही असं वक्तव्य त्यांच्या काही मित्रांनी केलं आहे.  'ते जेव्हा मुंबईला जात होते, तेव्हा त्यांची गाडीत बिघाड झाला. त्यामुळे ऐरोली पूलाजवळ गाडी उभी केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांची गाडी चोरीला गेली. याबाबत त्यांनी पोलिसांत तक्रार देखील दाखल केली.' असं त्यांनी सांगितले. 



मनसुख यांचे मित्र पुढे म्हणाले, आता शवविच्छेदन झाल्यानंतर खरं कारण समोर येईल. पण ते आत्महत्या करू शकत नाही. असं देखील त्यांच्या मित्र परिवाराकडून सांगितलं आहे. हिरेन मनसुख यांचं ठाण्यात ऑटो पार्टसचं दुकान आहे, ते कामानिमित्त मुंबईला जात असताना, त्यांच्या गाडीचं स्टेअरिंग जॅम झालं होतं, म्हणून ते गाडी तेथेच सोडून ओलाने निघून गेले होते.