मंत्रालयातील संकेतस्थळ दोन तासांपासून बंद
राज्य शासनाचे मंत्रालयातील सर्व्हर ठप्प झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ऑनलाईन सेवां बंद पडल्या आहेत. त्यामुळे गेल्या दोन तासांपासून कोणतीही वेबसाईट बघता येत नाही.
मुंबई : राज्य शासनाचे मंत्रालयातील सर्व्हर ठप्प झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ऑनलाईन सेवां बंद पडल्या आहेत. त्यामुळे गेल्या दोन तासांपासून कोणतीही वेबसाईट बघता येत नाही.
राज्याचे मुख्य संकेतस्थळ गेले दोन तास बंद पडले आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून होणारे व्यवहार बंद झाले आहेत. तसंच मंत्रालयात विभागांमध्ये चालणारे अंतर्गत व्यवहार हा सर्व्हर बंद पडल्याने गेले दोन तास ठप्प झाले आहेत. कारण मंत्रालयातील मुख्य सर्व्हरमध्ये बिघाड झाला आहे.
यामुळे राज्य सरकारच्या ऑनलाईन सेवांवर मोठा परिणाम झाला आहे. बिघाडाचे कारण सर्व्हर रूममधील वातानुकूलितचे तापमान वाढल्याने हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.