मुंबई :  मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा ई मेल करणा-याला अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपुर्वी शैलेंद्र शिंदे नावाच्या व्यक्तीने मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा मेल गृह विभागाला केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी चौकशी केल्यावर ही केवळ अफवा असल्याचं समजलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेल करणाऱ्या शैलेंद्र शिंदेला आता अटक करण्यात आलीय.चौकशी केली असता मुलाला शाळेत ऍडमिशन न मिळाल्याने त्यांने असा प्रकार केला.  शैलेंद्र शिंदे असे मेल करणार्‍या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रालयात बॉम्ब ठेवला असल्याचा ई मेल बी. टी. कवडे रोड परिसरात रहाणार्‍या शैलेंद्र शिंदे या व्यक्तिने केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार संबधित व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर, त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता.


शैलेंद्र याने मुलाला शाळेत अ‍ॅडमिशन मिळाले नसल्याने, असा प्रकार केल्याचे त्यांनी सांगितले. अशी माहिती मुंढवा पोलिसांनी सांगितली असून या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर मरिन ड्राईव्ह पोलिसांनी थोड्याच वेळापूर्वी, आरोपीला ताब्यात घेऊन गेले असल्याचे त्यांनी सांगितले.