मुंबई : निवडणूक आयोगाने शनिवारी 4 तासाच्या बैठकीनंतर धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. याचा सर्वाधिक फटका उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांना बसला आहे. कारण अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिंदे गट उमेदवार देणार नसल्याने याचा फायदा भाजपच्या उमेदवाराला होऊ शकतो. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर आणि शिवसेना (Shiv sena) हे नाव देखील आता दोन्ही गटाला वापरता येणार नाहीये. त्यामुळे आज दोन्ही गटाच्या बैठका होत आहे. नवीन नाव आणि चिन्हा बाबत निर्णय घेतला जाणार आहे. (Big shock to Uddhav thackeray form eknath shinde)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेतील अनेक कार्यकर्ते आज शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा बंगल्यावर (Varsha Banglow) हा पक्ष प्रवेश होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. दसरा मेळाव्यात शिंदे गटात शेकडो कार्यकर्ते प्रवेश करतील असं बोललं जात होतं. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.


शिंदे गटात कोणता मोठा नेता प्रवेश करतो या हे पाहावं लागेल. शिवसेनेत फूट पडल्यानंतर दोन्ही गटाकडून शक्तीप्रदर्शन सुरु आहे. आपल्याकडेच सर्वाधिक संख्याबळ असल्याचा दावा दोन्ही गट करत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून आतापर्यंत हजारो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.


शिवसेनेवर दोन्ही गटाकडून दावा केला जात आहे. पण निवडणूक आयोग आता शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे कायमचं गोठवते का हे पाहावं लागेल. पण असं झालं तर दोन्ही गटाला शुन्यापासून सुरुवात करावी लागेल.


अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक (Andheri assembly by-election) ही उद्धव ठाकरे यांच्यासाठी लिटमस टेस्ट असणार आहे. ठाकरे गटाचा उमेदवार निवडून आला तर आगामी महापालिका निवडणुकीत ही त्याचा फायदा होईल. पण जर उमेदवार पडला तर याचा भाजपला पुढे ही फायदा होऊ शकतो.