मुंबई : लाखोंच्या संख्येने मराठा क्रांती मोर्च्यात सहभागी झाले आहेत. मुंबईसह राज्यभरातून मराठा मोर्चासाठी मराठा बांधव दाखल झाले आहेत. असं असताना आता बॉलिवूडमधील स्टार अभिनेता रितेश देशमुखने देखील या मराठा क्रांती मोर्चात उडी घेतली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रितेश देशमुखने याबाबत ट्विटकरून आपला सहभाग दर्शवला आहे. रितेशने रात्री १२ वाजून १९ मिनिटांनी मराठा मोर्चाबाबत एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये रितेश देशमुखने या ट्विटमध्ये एक मराठा लाख मराठा, मराठा क्रांती मोर्चा, मुंबई असे तीन हॅशटॅग दिले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचं आराद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो देखील अपलोड केला आहे. 



आपल्या साऱ्यांना माहितच आहे की, अभिनेता रितेश देशमुख "छत्रपती शिवाजी महाराजांवर" सिनेमा तयार करत आहे. यामध्ये स्वतः रितेश शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. अभिनेत्री जेनेलिया डिसूजाची निर्मिती असलेल्या ‘छत्रपती शिवाजी’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा रवी जाधव यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे.जेनेलिया आणि मुंबई फिल्म कंपनीची निर्मिती असलेल्या ‘छत्रपती शिवाजी’ चित्रपटात रितेश देशमुखच शिवाजी महाराजांची चरित्र भूमिका साकारणार आहे. रितेश देशमुख लवकरच बिग बजेट छत्रपती शिवाजी हा सिनेमा घेऊन येणार आहे. या सिनेमाचं बजेट हे बाहुबली सिनेमाच्या तोडीचं असल्याचं देखील दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी सांगितलं आहे. 


रितेश देशमुखने या मराठा क्रांती मोर्चात अप्रत्यक्षरित्या सहभाग घेऊन मराठा बांधवांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांचे मनोबल वाठले आहे, यात शंकाच नाही.