मुंबई: महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला १५ नोव्हेंबरपर्यंत आरक्षण दिले जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र, जर आरक्षण दिले नाही. तर मराठा समाजाच्यावतीने १६ आणि २४ नोव्हेंबरला महसूल विभागात मराठा संवाद यात्रा काढली जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याशिवाय, २६ नोव्हेंबरला लाखोंच्या संख्येने मराठा समाज विधानभवनावर धडकणार असल्याची घोषणादेखील करण्यात आली. उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यातील समन्वयकाची एकत्रित बैठक नाशिकमध्ये पार पडली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. 


दरम्यान, सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात केलेली घोषणा पूर्ण होऊ शकली नाही तर येणाऱ्या काळात मराठा समाजाकडून सरकार विरोधात मुंबईत एल्गार पुकारणार असल्याचे चित्र आहे. 


गेल्या ९ दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसलेल्या सकल मराठा क्रांती मोर्चातील दोन कार्यकर्त्यांना शनिवारी तब्येत खालावल्याने जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी ४० मराठ्यांनी जीव गमावल्यानंतर सरकार आणखी किती जीव घेणार आहे? असा सवाल समन्वयक प्राध्यापक संभाजी पाटील यांनी उपस्थित केला आहे.