मुंबई : मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) आज मातोश्रीवर मशाल मार्चचे आयोजन केले आहे. याबाबत पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चाच्या ( Maratha Kranti Mahamorcha) पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीस (Mumbai police) बजावल्या आहेत. तरीही मुख्यमंत्र्यांच्या घरावर मशाल मार्च काढणारच असा पवित्रा पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. याबाबत मराठा क्रांती मोर्चाचे मुंबई समन्वयक राजन घाग यांनी निर्धार केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठा क्रांती महामोर्चा तर्फे वांद्रे शासकीय वसाहत ते मातोश्रीपर्यंत मराठा क्रांती मोर्चा मशाल मोर्चाचे (Mashal Morcha) आयोजन केले आहे. त्याची तयारी देखील वांद्रे शासकीय वसाहतीच्या जवळील उद्यानात सुरू आहे. मात्र या मोर्चाला पोलिसांची परवानगी नाही. तरी मोर्चा काढणार असल्याचा आयोजकांचा निर्धार आहे. 


पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त वाढवला असून कायदा आणि सुवव्यवस्था बिघडणार नाही याकड लक्ष ठेऊन आहेत. दरम्यान, पोलिसांनी परवानगी दिली नाही, तरीही आज मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मातोश्रीवर मशाल मोर्चा निघणार म्हणजे निघणारच, अशी माहिती शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे  (Shivsangram Leader Vinayak Mete ) यांनी दिली आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारचा दृष्टकोन उदासीन असून मराठा मोर्चाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचे मेटे यांचे म्हणणे आहे.