मुंबई : कोपरखैराणेच्या दगडफेकीत जखमी झालेल्या २१ वर्षीय तरुण रोहन तोडकरचा काला रात्री उशिरा मृत्यू झालाय.रोहनवर मुंबईतल्या जेजे रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी मराठा आरक्षणासाठी नवी मुंबई  बंदची हाक देण्यात आली होती. या बंद दरम्यान झालेल्या दगडफेकीत रोहनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. या दगडफेकीत तिघे जखमी झाले होते. त्यात रोहनचा समावेश होता. काल रात्री उशिरा जेजे रुग्णालयात शवविच्छेदन करून रोहनचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. जेजे रुग्णालयात यानंतर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.


पाच आमदारांचा राजीनामा 


आरक्षणाच्या मागणीवरून मराठा आंदोलक अधिकाधिक आक्रमक होताना दिसताहेत. या आंदोलनाला घेऊन आता राजनितीदेखील सुरू झालीयं. कॉंग्रेस, एनसीपी आणि शिवसेना या प्रकरणी सत्तेत असलेल्या भाजपावर निशाणा साधतेय. भाजपाच्या गोटातही या प्रकरणाला घेऊन अंतर्गत वादळ उफाळलंय.  महाराष्ट्रातील पाच आमदारांनी राजीनामा दिलाय.
 टाईम्स नाऊने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र विधानसभेतील भरत भाल्के (कॉंग्रेस), राहुल अहेर (भाजपा) आणि दत्तात्रेय भारणे (राकांपा) यांनी गुरूवारी आमदार पदाचा राजीनामा दिलाय. याआधी बुधवारी हर्षवर्धन जाधव (शिवसेना) आणि भाऊसाहेब पाटील चिकटगावकर (राकंपा) यांनीही आरक्षण मागणी समर्थनार्थ राजीनामा समोर ठेवला. जाधव यांनी गुरूवारी सकाळी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयात आपले राजीनामा पत्र पाठवलेयं.