मुंबई: हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घ्या, अशी मागणी सकल मराठा क्रांती महामोर्चाने केली. मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेले बेमुदत उपोषण मराठा क्रांती सकल महामोर्चाने मागे घेतले होते. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आंदोलकांनी सरकारला इशारा दिला. आंदोलनातील मागण्यांबाबत सरकारने निर्णय घेतला नाही तर मराठा समाजाचा पुन्हा एकदा उद्रेक होईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिवाळी अधिवेशनात मुस्लिमांनाही आरक्षण द्या


पुण्यातील बोपोडी भागात आरक्षणासाठी मुस्लिम संघटनांनी आंदोलन केलं. मुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलनाची जशी तारीख जाहीर केली तशी मुस्लिम आरक्षणाचीही करा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. 


हिवाळी अधिवेशनात मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. आर्थिक आणि शैक्षणिक आरक्षण मिळावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांचा रस्ताही अडवला.


आंदोलकांना रास्ता रोकोची परवानगी देण्यात आली नसल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या पत्रकार परिषदेत धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही, अशी भूमिका घेतल्याने हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.