Ketaki Chitale Bail : केतकी चितळेला अखेर जामीन मंजूर
ketki chitale granted bail : मराठी अभिनेत्री केतकी चितळेला मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई : मराठी अभिनेत्री केतकी चितळेला (Ketaki Chitale Bail) मोठा दिलासा मिळाला आहे. केतकीला एट्रोसिटी प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. केतकीला ठाणे सत्र न्यायालयानं 25 हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केलाय. मात्र जामीन मिळाला असला तरी केतकीची जेलमधून सुटका होणार नाही. त्यामुळे कही खुशी कही गम अशीच काहीशी स्थिती केतकीची आहे. केतकी विरुद्ध नवी मुंबईतल्या रबाळे पोलिस ठाण्यात एट्रोसिटी गुन्हा दाखल करण्यात आला होता. (marathi actress ketki chitale granted bail in atrocity case)
तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविरोधात केलेलेल्या वादग्रस्त पोस्टबाबत आणि आणि इतर प्रकरणात अद्यापही केतकीला दिलासा मिळू शकलेला नाही. त्यामुळे केतकीता जेलमधील मुक्काम कायम असणारंय.
केतकीची मुंबई उच्च न्यायालयात नवी याचिका
दरम्यान केतकीने मुंबई उच्च न्यायालयात नवी याचिका केली आहे. केतकीने आपल्याला करण्यात आलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचं या याचिकेत नमूद केलंय.
केतकीला शरद पवार यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह फेसबूक पोस्ट प्रकरणी अटक करण्यात आली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. केतकी 14 मे पासून पोलीस कोठडीत आहे. त्यामुळे आता उच्च न्यायालय केतकीच्या या नव्या याचिकेवर काय निर्णय घेतं, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.