मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचीही चौकशी करा; अनिल परब यांचा फडणवीसांना पलटवार
मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी उत्तर देताना मंत्री अनिल परब यांनी खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येची चौकशी करण्याची मागणी केली.
मुंबई : मनसुख हिरेन प्रकरणी विधिमंडळात प्रचंड गोंधळ आज पहायला मिळाला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप करीत त्यांच्या अटकेची मागणी केली.
फड़णवीस यांच्या आरोपांना मंत्री अनिल परब यांनी उत्तर देताना,'खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचीही चौकशी करण्याचे मागणी केली. डेलकरांच्या सुसाईड नोटमध्ये ज्यांची नावे आहेत. त्यांना देखील अटक झालीच पाहिजे'. अशीही मागणी परब यांनी केली.
'भाजप खासदार मोहन डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये प्रशासकाचे नाव आहे. प्रशासक कोणत्याही पक्षाचे नसतात. त्यामुळे डेलकऱ्यांच्या आत्महत्येची ढाल पुढे करून सरकार मनसुख हिरेन प्रकरणी सचिन वाझेंना प्रयत्न करीत असल्याचा', आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.