मुंबई : राज्यातल्या इंग्रजी, गुजराती, उर्दू अशा सर्व भाषिक शाळांमध्ये पहिली ते दहावी इयत्तेमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्याचा ठराव विधानसभेनं करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी विषय सक्तीचा केला नाही तर पुढच्या पिढीला मराठी वाचता येणार नाही, अशी भीती अजित पवारांनी व्यक्त केली. 


आपल्या राज्यातल्या काही मंत्र्यांचं इंग्रजीत शिक्षण झालंय... त्यांना मराठीत उत्तर देता येत नाही, त्यामळे ते सभागृहात उत्तर देणं टाळतात... ही बाबही अजित पवारांनी यावेळी निदर्शनाला आणून दिली.


दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटलांनी दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मराठी सक्तीचं करण्याच्या मागणीला पाठिंबा दिला. 


तावडेंनी दिलं उत्तर... 


अजित पवारांच्या या मागणीला उत्तर देताना शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले की, आपल्या राज्यात आठवीपर्यंत मराठी अनिवार्य आहे. विधानसभेची ही भावना अभ्यास मंडळाला कळवली जाईल, त्यानंतर अभ्यासमंडळ याबाबत निर्णय घेईल, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.