मुंबई : मुंबई महापालिकेत विविध पदासांठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ आणि फार्मासिस्ट या पदांसाठी सध्या भरती होणार आहे. उमेदवारांना यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. portal.mcgm.gov.in या वेबसाईटवर जावून अर्ज करता येईल. (MCGM Recruitment 2021)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरणे आवश्यत आहे. कारण एकही चूक असल्यास तुमचा फॉर्म रद्द होऊ शकतो. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2021 आहे. 


किती पदांसाठी भऱती


प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 89 जागा
फार्मासिस्ट - 96 जागा


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिसूचनेनुसार प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून बीएससी पदवी तर फार्मासिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची बीफार्मा पदवी घेतलेली असावी. 


- उमेदवाराचे वय हे 18 वर्षे ते 65 वर्षे असावे. 


पगार किती?


प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 18,000 रुपये
फार्मासिस्ट - 18,000 रुपये