मुंबई : मराठा आरक्षणाबाबत आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही सर्वपक्षीय नेत्यांची बैठक  बोलवली आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीबाबत आणि ही स्थगिती उठवण्याबाबतच्या पर्यायांवर चर्चा होणार आहे. संध्याकाळी साडे सहा वाजता मुंबईतल्या सह्याद्री या सरकारी गेस्ट हाऊसवर ही बैठक होईल.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, मराठा आरक्षणाचा तिढा सोडवायचा असेल तर मराठा समाजाचा सरसकट ओबीसी कोट्यात समावेश करावा, अशी मागणी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर यांनी 'झी २४ तास'च्या विशेष मुलाखतीत केली. मराठा आरक्षण स्थगितीचे पडसाद राज्यसभेतही उमटले. मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवावी अशी मागणी सर्वपक्षीय खासदारांनी केली. तर दुसरीकडे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. पवारांनी चार पर्याय सूचवले असून त्यापैकी कोणता पर्याय टिकू शकतो हे पाहावं लागेल असं संभाजीराजेंनी सांगिंतले.


मराठा आरक्षणाला ओबीसी नेत्यांनी जाहीर पाठिंबा दर्शवलाय. मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतलीय. ओबीसी आणि भटक्या विमुक्तांचं आरक्षण कसं बेकायदा आहे हे काही मराठा नेते बोलत आहेत. मराठा समाजाच्या नेत्यांनी ओबीसी आरक्षणाबाबत प्रक्षोभक वक्तव्य करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.