मुंबई : भाजपतर्फे राज्यसभेची उमेदवारी घ्यायची की नाही, याचा निर्णय नारायण राणे आज (शनिवार, १० फेब्रुवारी) जाहीर करणार आहेत.


राणे कोकणातून तातडीनं मुंबईत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नारायण राणेंनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांची विधानभवनात भेट घेतली. या भेटीसाठी राणे शुक्रवारी कोकणातून तातडीनं मुंबईत दाखल झाले. दोघांची विधानभवनात बैठक झाली. राणे शनिवारी पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर राणे निर्णय जाहीर करणार आहेत.


भाजपच्या 'त्या' दोन नावांबद्धल उत्सुकता


दरम्यान,  राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या 23 मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपाकडून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मुंबईतील विधानभवनात येऊन उमेदवारी अर्ज भरला. या निवडणुकीत भाजपाचे तीन उमेदवार निवडून येऊ शकतात. मात्र नारायण राणे यांच्या उमेदवारीबाबत निर्णय होत नसल्याने भाजपाने इतर दोन नावं अद्याप जाहीर केलेली नाही. या निवडणुकीसाठी यापूर्वी शिवसेनेतर्फे अनिल देसाई आणि राष्ट्रवादीतर्फे वंदना चव्हाण यांनी अर्ज भरला आहे. तर काँग्रेसकडूनही अद्याप उमेदवार निश्चित करण्यात आलेला नाही.  12 मार्च ही राज्यसभेसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.