मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी १८ फेब्रुवारी रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य रेल्वेच्या कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० वाजेपर्यत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ब्लॉक दरम्यान कल्याण ते ठाणे मार्गावरील अप धिम्या वाहतूक अप जलद मार्गावरुन चालविण्यात येईल. 


तसेच डाऊन जलद मार्गावरील लोकल गाड्यांना सकाळी १०.०५ ते दुपारी २.४२ या वेळेत विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड आणि दिवा या स्थानकांवरही थांबावं लागेल...


तर ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे-वाशी-नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ब्लॉक दरम्यान ठाणे ते वाशी आणि नेरुळ लोकल बंद ठेवण्यात आली आहे. 


तर पश्चिम रेल्वे बोरीवली ते नायगाव स्थानकादरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत हा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावरील सर्व लोकल सेवा अप आणि डाउन धिम्या मार्गावरुन चालविण्यात येणार आहेत.