मध्य रेल्वेवर शनिवारी - रविवारी मेगाब्लॉक...
मध्य रेल्वेवर आटगाव ते वाशिंद दरम्यान अप मार्गावर पादचारी उड्डाण पुलाचा गर्डर टाकण्यासाठी शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री साडे पाच तासांचा ट्रॅफीक पॉवर ब्लॉक घेणार आहेत.
मुंबई : मध्य रेल्वेवर आटगाव ते वाशिंद दरम्यान अप मार्गावर पादचारी उड्डाण पुलाचा गर्डर टाकण्यासाठी शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री साडे पाच तासांचा ट्रॅफीक पॉवर ब्लॉक घेणार आहेत.
रात्री १०.५० ते पहाटे ४.२० पर्यंत हे काम चालेल. या ब्लॉकमुळे उपनगरीय रेल्वेसेवेसह लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.
आटगाव वाशिंद पॉवर ब्लॉक
- सीएसएमटीवरून रात्री ८.५६ ला सुटणारी आसनगाव लोकल टिटवाळ्यापर्यंत चालवण्यात येईल
- तर आसनगावहून रात्री ११.०८ वाजता सुटणारी ठाणे लोकल रद्द करण्यात आली आहे
- लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस, एलटीटी मनमाड गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत
- दरभंगा-एलटीटी एक्सप्रेस, अमृतसर-सीएसएमटी, गोरखपूर- एलटीटी एक्सप्रेस, कुशीनगर एक्सप्रेस, शालीमार-एलटीटी एक्सप्रेस, हावडा-सीएसएमटी, नंदीग्राम एक्सप्रेस, अमरावती- सीएसएमटी, विदर्भ एक्सप्रेस, देवगिरी एक्सप्रेस, पंजाब मेल, हावडा-एलटीटी, दुरांतो एक्सप्रेस आणि मंगला एक्सप्रेस या नियंत्रीत केल्या जाणार आहेत
- भुसावळवरून सुटणारी भुसावळ पुणे एक्स्प्रेस मनमाड दौंडमार्गे चालणार आहे