मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळाच्या दुरुस्ती-देखभालीसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील कल्याण ते ठाणे अप धीम्य मार्गावर दुरूस्तीचं काम असणार आहे. सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 पर्यंत दुरूस्तीची काम करण्यात येणार आहेत. ब्लॉक दरम्यान कल्याण ते ठाणे मार्गावरील अप धीम्या वाहतूक अप जलद मार्गावरून चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्बरवर कुर्ला-वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत ब्लॉक असणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर आज मध्यरात्री माटुंगा ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान नाईट ब्लॉक घेतला जाणार आहे.


दरम्यान, धोकादायक खडकाचे स्कॅनिंग करणे आणि तडे शोधून ते सिमेंटने भरण्याचे काम पावसाळ्यापूर्वी केले जाते. ड्रोनच्या ताफ्यामुळे धोकादायक भागांचे सर्व्हेक्षण करणे सोपे झाले आहे. मध्य रेल्वेने मुंबई पोलिसांकडे ड्रोन वापरण्यासाठी विषेश परवानगी मागितली आहे. मुंबई ते पुणे मार्गावर मान्सून तयारीसाठी ड्रोनने पाहणी करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रति किमी ३ ते ५ हजार रुपये भाडे आकारण्यात येणार आहे.