COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : मुंबईतल्या परळच्या नरेपार्क मैदानात सध्या खवय्यांची एकच झुंबड उडालीय... निमित्त आहे ते मेगा मिसळ महोत्सवाचं... येत्या १५ एप्रिलपर्यंत मुंबईकरांसाठी हा खाद्य महोत्सव सुरू राहणार असून, नानाविध प्रकारच्या मिसळ चाखण्याची संधी त्यांना मिळणाराय... मिसळ... गरमागरम... झणझणीत... चमचमीत आणि स्वादिष्ट मिसळ.... केवळ नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं... रुचकर मिसळ आणि तोंडाला पाणी आणणारी तर्री... असा बेत जुळून आल्यानंतर मराठी माणसाची पावलं तिथं वळली नाही तरच नवल... सध्या परळच्या नरे पार्कमध्येही गुरूवारपासून मिसळ महोत्सव सुरू झालाय... विविध प्रकारच्या तब्बल ५० मिसळींची चव तुम्हाला एकाच ठिकाणी चाखता येणाराय.. या पर्वणीचं सोनं करण्यासाठी खवय्यांची इथं एकच झुंबड उडालीय...


चुलीवरची गावरान मिसळ


चुलीवरची गावरान मिसळ... तांबड्या रश्श्याची झणझणीत मिसळ... पांढऱ्या रश्श्याची मिसळ... काळ्या रश्श्याची चमचमीत मिसळ... हिरव्या रश्श्याची मस्त मिसळ... उपवासाची मिसळ आणि मराठी माणसाच्या गिरणगावात जैन मिसळ.... कुठं मुगाची उसळ, तर कुठं वाटाण्याचा रस्सा... कुठं पोह्याचा चिवडा तर कुठं फरसाण... वेगवेगळ्या प्रांतांची खासियत असलेल्या मिसळ इथं खवय्यांची भूक भागवतायत...


आराध्य फाऊंडेशनचा उपक्रम 


पुण्यातील ‘काटा कीर्र’, नाशकातील ‘भगवती’, मुंबईतील ‘आस्वाद’, ठाण्यातील ‘मामलेदार’, लोणावळ्याची ‘मनशक्ती’ अशा मिसळी तर खवय्यांच्या जिभेवर राज्य करतायत... ठाणे, डोंबिवली आणि मुलुंडमधील मिसळ महोत्सवाच्या यशानंतर आराध्य फाऊंडेशन यांनी हा परळमध्ये हा मिसळ महोत्सवाचा थाट रचलाय... स्थानिक मिसळप्रेमींकडूनही या महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळतोय...