मुंबई : मध्य रेल्वेवर उद्या कल्याण ते ठाणे अप फास्ट मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ वाजेपर्यत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्बर मार्गावर कुर्ला-मानखुर्द तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेवर कल्याणहून सुटणाऱ्या अप जलद मार्गाच्या फेऱ्या स. १०.५४ ते दु. ४.१९ पर्यंत ठाण्यापर्यत अप स्लो मार्गावर चालवण्यात येतील.


ठाणे आणि सीएसएमटीपर्यंत लोकल नियमित स्वरुपात अप फास्ट मार्गावर चालवण्यात येतील. तर हार्बर मार्गावर कुर्ला ते मानखुर्द स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यत दुरुस्तीची कामे सुरु राहतील. 


तर पश्चिम रेल्वेचा जम्बो ब्लॉक असल्याने चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर स.१०.३५ ते दु. ३.३५ वाजेपर्यंत जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहेत. तर ब्लॉक कालावधीमध्ये काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.