मुंबई : नवीन वर्षाच्या दुसऱ्या रविवारी देखील मेगाब्लॉक असल्यामुळे प्रवाशांनी काळजी घ्यायची आहे. मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे या दोन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक असणार आहे. हा मेगाब्लॉक 11 ते 4 या दरम्यान असणार आहे. दोन्ही मार्गांवरील मेगाब्लॉकच्या वेळा वेगळ्या असल्यातरीही प्रवाशांनी प्रवास करताना ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेवर  मुलुंड ते माटुंगा या स्थानकादरम्यान डाऊन स्लो मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. महत्वाचं म्हणजे हा मेगाब्लॉक सकाळी 11.20 ते दुपारी 3.50पर्यंत मेगाब्लॉक या वेळेत असणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी या वेळेत प्रवास करताना काळजी घ्यायची आहे. शक्य असल्याच प्रवास टाळा. अन्यथा तुम्हाला गैरसोईला सामोरे जावे लागेल. 



तसेच हार्बर रेल्वे मार्गावर देखील मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. हा मेगाब्लॉक  पनवेल ते वाशी दरम्यान असणार आहे. हा मेगाब्लॉक सकाळी 11.30 ते दुपारी 4 पर्यंत असणार आहे. या मेगाब्लॉकमुळे चाकरमान्यांची गैरसोय होणार आहे. 


या अगोदर देखील म्हणजे गेल्या रविवारी 5 जानेवारी रोजी देखील मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला होता. तसेच पश्चिम रेल्वेवर वांद्रे दरम्यान गार्डरचं काम सुरू असल्यामुळेही मेगाब्लॉक होता. आज मात्र मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक आहे. तसेच पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या मेगाब्लॉकचा फटका बसणार नाही.