Mega Block : मध्य रेल्वेचा रविवारी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक
Mega Block on Central Railway : 3 एप्रिल 2022 रविवारी मध्य रेल्वे विशेष मेगाब्लॉक घेणार आहे.
Mega Block : मध्य रेल्वे रविवारी 3 एप्रिल 2022 रोजी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेणार आहे. मध्य रेल्वेच्या (Central Railway) दिवा स्थानकावर (Diva Station) जुनी रूट रिले इंटरलॉकिंग इमारत पाडून आणि अप आणि डाऊन जलद मार्ग स्लीव्हिंगचे काम, ओएचई स्लीव्हिंग आणि क्रॉस ओव्हर पॉइंटच्या कामासाठी विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. (Mega block on Sunday)
ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक
ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 09.00 ते रात्री 09.00 पर्यंत हा ब्लॉक घेतला जाणार आहे. ज्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी 07.55 ते संध्याकाळी 07.50 या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद लोकल मुलुंड/ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांच्या निर्धारित थांब्यानुसार स्थानकावर थांबतील आणि निर्धारित वेळेच्या 10 ते 15 मिनिटे उशिरा पोहोचतील.
सकाळी 08.30 ते रात्री 09.12 पर्यंत कल्याणहून सुटणाऱ्या अप जलद लोकल कल्याण आणि ठाणे/मुलुंड स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित थांब्यानुसार स्थानकावर थांबतील आणि निर्धारित वेळेच्या 10 ते 15 मिनिटे उशिरा पोहोचती.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथून सुटणाऱ्या मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान 5व्या मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेपेक्षा 15 ते 20 मिनिटे उशिराने पोहोचतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादरला येणार्या मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण ते ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान 6व्या मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेपेक्षा 15 ते 20 मिनिटे उशिरा पोहोचतील.