मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वेच्या तीनही मार्गावर आज मेगा ब्लॉक आहे. मध्य रेल्वे मुख्य मार्गावर कल्याण ते ठाणे अप जलद मार्ग, हार्बरवर पनवेल ते वाशी, नेरुळ, बेलापूर ते खारकोपरदरम्यान दोन्ही मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवर मरिन लाइन्स ते माहिमदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक आहे. मरीन लाईन ते माहीम डाऊन धीम्या सकाळी १०.३५ ते  दुपारी०३.३५ वाजेपर्यंत परिणामी डाऊन धीम्या मार्गावरील लोकल डाऊन जलद मार्गवरुन चालविण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


या लोकल महालक्ष्मी, प्रभादेवी , माटुंगा स्थानकात थांबणार नाही. तर लोअर परळ आणि माहीम स्थानकात लोकल दोन वेळा थांबणार आहे. मध्य रेल्वे मुख्य मार्ग व पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्या पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावतील.