Mega Block : रविवारी घराबाहेर पडून लोकलने (Local) प्रवास करणार असाल तर आधी रेल्वेच्या कोणत्या मार्गावर आणि कोणत्या वेळेत मेगा ब्लॉक (Mega Block) आहे याचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा. रविवारी म्हणजे 12 मार्चला मध्य रेल्वे (Central Railway) मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांकरीता उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.5 ते दुपारी 3.55 पर्यंत मेगा ब्लॉग घेतला जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असं असेल रविवारचं वेळापत्रक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई इथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या दरम्यान लोकल नियोजित थांब्यांवर थांबतील.  ठाणे रेल्वे स्टेशनच्या पुढे या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील तसंच नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटं उशिरानं गंतव्यस्थानी पोहोचेल.


ठाणे इथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने पोहोचतील.


हार्बर मार्गावरचं वेळापत्रक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी/वांद्रे डाउन  हार्बर मार्गावर (Harbour Railway) सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येईल.


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि वडाळा रोड इथून सकाळी 11.16 ते संध्याकाळी 4.47 या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणारी आणि वांद्रे, गोरेगाव इथून  सकाळी 10.48 ते संध्याकाळी 4.43 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.


तसंच पनवेल, बेलापूर, वाशी इथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे इथून सकाळी 10.45 ते संध्याकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
 
दरम्यान, प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. 8) दरम्यान विशेष सेवा सुमारे 20 मिनिटांच्या वारंवारतेने चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.