आरे कॉलनीत मेट्रो कारशेडसाठी परवानगी मिळालेलीच नाही?
हरित लवादानं आरे कॉलनीतील झाडं तोडण्यास थेट परवानगी दिली नसल्याचा दावा
मुंबई : हरित लवादाने मुंबईतल्या आरे कॉलनीत मेट्रोचं कारशेड उभारण्यास परवानगी दिल्याच्या बातम्या निराधार असल्याचा दावा याचिकाकर्ते आणि वनशक्तीचे डी. स्टॅलिन यांनी केलाय. स्टॅलिन यांच्या दाव्यानुसार आरे कॉलनीला फॉरेस्ट झोन घोषित करावा यासाठी चार वर्षांपूर्वी एक याचिका दाखल केली होती. काल झालेल्या सुनावणीत यावर निर्णय घेण्याचा अधिकार हरित लवादाला नसल्याचं लवादानं स्पष्ट केलं.
केवळ उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयच याबाबत निर्णय घेऊ शकतं असंही लवादानं स्पष्ट केल्याची माहिती स्टॅलिन यांनी दिलीय. त्यामुळे हरित लवादानं आरे कॉलनीतील झाडं तोडण्यास थेट परवानगी दिली नसल्याचा दावा स्टॅलिन यांनी केलाय.