मुंबई : मुंबईत छोट्या फ्लॅटसाठी कोट्यवधी रुपये मोजणं शक्य नसल्यामुळे २०१७ मध्ये जवळपास ८० टक्के लोकांनी म्हाडाची लॉटरीत जिंकलेली घरं परत केली आहेत. लोअर परेल भागात म्हाडाचं ३६५ स्क्वेअर फिटचं घर १.४२ कोटी तर ४७५ स्क्वेअर फिट घरासाठी १.९६ कोटी रुपये किंमत असल्यानं नागरिकांनी लॉटरीद्वारे जिंकलेली घरं न घेण्याचा निर्णय घेतलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आत्तापर्यंत तब्बल २९ विजेत्यांनी घर घेण्यास नका दिल्याची माहिती 'म्हाडा'चे प्रमुख अधिकारी दिपेंद्र सिंह खुसवाहा यांनी दिलीय.


याखेरीज पवईतही अनेक जणांनी म्हाडाची घरं नाकारली आहेत. पवईत म्हाडाच्या घरांच्या किमती १.३९ कोटी रुपये एवढ्या आहेत. 


मुंबईमध्ये कमी किमतीत स्वत:चं घरांचं स्वप्न म्हाडाद्वारे साकार होतं. मात्र, म्हाडानंच एवढ्या प्रचंड प्रमाणात किंमती वाढवल्यानं सर्वसामान्यांचं मुंबईत स्वत:च्या हक्काचं घराचं स्वप्न काही पूर्ण होऊ शकत नाहीय.