Mhada Lottery 2023 Mumbai : ‘म्हाडा’च्या घरांसाठी कर्ज मिळणं अशक्य आहे. कारण सदनिकांच्या किमती आणि उत्पन्न यात मोठी तफावत असल्यामुळे इच्छुकांना गृहकर्ज मिळणे अशक्य होण्याची शक्यता आहे. घरांसाठी उत्पन्नाची मर्यादा वर्षांला 9 लाख आणि परवडणारे घर दीड कोटींला अशी विसंगती निर्माण झाली आहे. अल्प आणि मध्यम गटातही हीच परिस्थिती आहे. म्हाडाच्या उत्पन्न मर्यादेत नुकताच बदल करण्यात आला आहे. दरम्यान, नवीन मर्यादेसह मुंबई मंडळाची अंदाजे 3,900 घरांची सोडत लवकरच काढण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

म्हाडाची लॉटरी 2023 काढण्यात येणार आहे. यासाठी मुंबई बोर्डाने जवळपास 3,900 घरांची घोषणा केली आहे. या एकूण 2,612 घरे इडब्ल्यूएस विभागासाठी, 1,007 घरे एलआयजी विभागासाठी, 85 घरे एमआयजी विभागासाठी आणि 116 घरे एचआयजी विभागासाठी आहेत. म्हाडाच्या मुंबई लॉटरीची जाहिरात  मेच्या शेवटच्या आठवड्यात निघणे अपेक्षित आहे आणि लकी ड्रॉ जून/जुलै 2023 मध्ये काढला जाईल.  मुंबई म्हाडा लॉटरी 2023 अंतर्गत घराची किंमत 32 लाख रुपयांपासून सुरg होईल आणि सर्वात महाग 4 कोटी 38 लाख रुपयांना उपलब्ध असेल. त्यामुळे उत्पन्नाचा मेळ कसा बसवायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.


महाराष्ट्र सरकारने म्हाडा युनिट आकाराचे नियम बदलले आहेत.  राज्य सरकारने म्हाडाने बांधलेल्या आणि वाटप केलेल्या अपार्टमेंटच्या युनिट आकाराच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल केला आहे. बांधकामाधीन आणि आगामी काळात म्हाडाच्या सर्व सदनिकांसाठी ही सुधारणा लागू होईल. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एमआयजी श्रेणी अंतर्गत सुधारित चटईक्षेत्र हे पूर्वीच्या विद्यमान 1,722 चौरस फूट ऐवजी 968चौरस फूट आहे आणि एचआयजी श्रेणी अंतर्गत सुधारित चटईक्षेत्र आता पूर्वीच्या 2,152  चौरस फुटांच्या ऐवजी 968 चौरस फूट आकारले आहे.


तसेच, नवीन मार्गदर्शक तत्त्वांचा भाग म्हणून, म्हाडा अर्जदारांना त्यांच्या श्रेणीतील आणि त्यांच्यापेक्षा एक स्तरावरील गृहनिर्माण लॉटरीसाठी अर्ज करण्याची परवानगी देईल. मात्र, एचआयजी विभागातील अपार्टमेंटसाठी अर्ज करण्यासाठी म्हाडा इडब्ल्यूएस आणि एलआयजी श्रेणींना देखील प्रतिबंधित केला आहे.


नवीन म्हाडा लॉटरी धोरणाअंतर्गत नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे


म्हााचे घर घेणाऱ्यांसाठी आता एकदाच नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणीपूर्वी तुमच्याकडे कागदपत्रे तयार आहेत याची खात्री करा आणि अर्ज भरा. जर कागदपत्रे पूर्ण असतील आणि ओटीपीसाठी जो मोबाईल नंबर दिला असेल तोच ग्राह्य असणार आहे. कारण ओटीपी हा येते महत्त्वाचा घटक आहे.


आधार कार्डला ओटीपी म्हणून जोडलेला मोबाइल नंबर आणि लॉटरीशी संबंधित सर्व माहिती तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एसएमएस म्हणून पाठवली जाईल.
ओटीपी म्हणून नोंदणीकृत ईमेल आयडी आणि लॉटरी संबंधित सर्व माहिती नोंदणीकृत ईमेल खात्यावर ईमेल म्हणून पाठविली जाणार आहे. तसेच नोंदणीच्या वेळी आधार कार्डाच्या पुढील बाजूची आणि मागील बाजूची स्पष्ट प्रतिमा अपलोड करावी लागेल. विवाहित असल्यास, जोडीदाराचे आधार कार्ड देखील अपलोड करावे लागेल.


अधिवास प्रमाणपत्र (डोमासाईल) : लक्षात ठेवा की अधिवास प्रमाणपत्र मागील पाच वर्षांपूर्वीचे असणे आवश्यक आहे. नवीन अधिवास प्रमाणपत्र चालणार नाही.  आयटीआर बंधनकारक आहे. लक्षात ठेवा की आयटीआर पावतीच्या जागी सॅलरी स्लिप किंवा फॉर्म 16 अपलोड करणे अवैध मानले जाईल. आरक्षण गटात अर्ज केला असाल तर वैध जात प्रमाणपत्र अपलोड करावे लागणार आहे.