Mhada News : म्हाडाकडून 24 लाखांमध्ये 1BHK घराची विक्री; किमान खर्चात साकार होणार अनेकांचं स्वप्न
Mhada Lottery 2024: हक्काच्या घराच्या शोधात आहात? कर्जाचा बोजा नकोय? म्हाडाची ही योजना तुमच्यासाठी ठरू शकते उत्तम पर्याय. पाहा सविस्तर माहिती
Mhada Lottery : म्हाडा प्राधिकरणाच्या वतीनं आतापर्यंत मुंबई (Mumbai News) आणि नजीकच्या भागांसह राज्याच्या इतरही बऱ्याच भागांमध्ये सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घरं उपलब्ध करून दिली आहेत. सर्व आर्थिक गटांच्या अनुषंगानं म्हाडानं आतापर्यंत अनेक गृहयोजना सामान्यांपर्यंत आणल्या असून अनेकांनीच त्याचा लाभही घेतला आहे. त्यात म्हाडाच्या आणखी एका योजनेची जोड मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार म्हाडाकडून सोशल मीडियावर करण्य़ात आलेल्या जाहिरातीनुसार सोडतीतून प्रतिसाद न मिळालेली किंवा विक्रीशिवाय पडून राहिलेल्या घरांच्या विक्रीसाठी म्हाडानं महत्त्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. ज्याअंतर्गत आता (Virar Bolinj) विरार - बोळींज येथील घरांची विक्री करण्यास म्हाडा सज्ज असल्याचं म्हटलं जात आहे.
(Pancard ) पॅनकार्ड आणि आधार कार्डची (Adhar Card) नोंदणी करून घर खरेदी करण्याचं आवाहन इच्छुकांना करण्यात आलं आहे. त्यामुळं आता किमान खर्चात हक्काच्या घराचं स्वप्न साकारु पाहणाऱ्यांसाठी म्हाडाची ही योजना मोठा हातभार लावताना दिसणार आहे.
घरांची किंमत...
सर्व इमारतींना संबंधित आवश्यक प्रमाणपत्र प्राप्त असून त्यांचं वितरण सोडत प्रक्रियेशिवाय केलं जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. म्हाडाच्या या योजनेमध्ये उपलब्ध असणाऱ्या 1BHK च्या घरांची किंमत 23,28,566 रुपये इतकी आहे. तर, 2BHK घरांची किंमत 41,81,834 रुपये इतकी निर्धारित करण्यात आली आहे. प्रथम येणाऱ्या प्राधान्य तत्वावर या घरांची विक्री केली जाणार असून, सोडत प्रक्रियेशिवाय त्यांचं वितरण करण्यात येणार आहे.
हेसुद्धा वाचा : Rabindranath Tagore Jayanti 2024 Quotes : रवींद्रनाथ टागोर यांचे प्रेरणादायी विचार; संकटसमयी करतील तुमची मदत
घराची रक्कम पूर्ण भरणाऱ्यांना अवघ्या दोन दिवसांत घराचा ताबा मिळणार असून, पॅन आणि आधार कार्डच्या आधारे पात्रता निश्चित करून ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचं म्हाडाकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान सदर योजनेसाठी इच्छुकांनी म्हाडाच्या मुंबईतील वांद्रे येथे असणाऱ्या कार्यालयात संपर्क साधावा असं आवाहन इच्छुकांना करण्यात आलं आहे.