Mhada Lottery News : म्हाडाकडून अॅन्टॉप हिल, विक्रोळी कन्नमवार नगर,  गोरेगाव, वरळी या मुंबईतील काही मोक्याच्या ठिकाणाी असणाऱी घरांसाठीची सोडत काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आली आणि इच्छुकांनी या सोडतीसाठी अर्ज करत म्हाडाच्या या लॉटरीला प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. या सोडत आणि अर्ज भरणा प्रक्रियेमध्ये काही इच्छुकांनी मात्र म्हाडाच्या घरांच्या किमती अधिक असल्याचं म्हणत काहीसा नाराजीचा सूर आळवला. येत्या काळात म्हाडा हीच नराजी दूर करण्याच्या तयारीत असल्याचं स्पष्ट होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होणार
मुख्य शहरांकडे अनेकांचाच कल, तिथं मिळणाऱ्या संधी या आणि अशा अनेक कारणांमुळं सध्या घरांची मागणीही सातत्यानं वाढताना दिसत आहे. बदलत्या काळाची हीच मागणी लक्षात घेत दर्जेदार पण परवडणाऱ्या घरांची करण्यासाठी म्हाडा धोरणात्मक निर्णय घेणार आहे. खुद्द म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनीच असं आश्वासन दिल्यामुळं आता पुन्हा एकदा Mhada Lottery कडे सर्वांचं लक्ष वळलं आहे. 


स्वातंत्र्य दिनानिमित्तानं आयोजित ध्वजारोहण माजी सैनिक या प्रवर्गातून सद्यस्थितीत म्हाडामध्ये सेवेत असणाऱ्या 22 कर्मचाऱ्यांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जयस्वाल यांनी ही महत्त्वाची माहिती दिली. म्हाडा लोकाभिमुख कार्यालय असून, इथं नागरिकांच्या प्रश्नांबाबत प्रत्येक अधिकारी-कर्मचारी यांनी संवेदनशील असणं महत्त्वाचं असल्याचं म्हणत त्यांनी आग्रही सूर आळवला. 


म्हाडाकडून अटी शिथिल करण्याच्या हालचाली 


म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरत असताना अर्जदारांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. अर्जदारांची डीजी लॉकरच्या कटकटीतून सुटका म्हाडाच्या घरांसाठी या माध्यमातून कागदपत्रं सादर करण्याची अट शिथिल करून जुन्या पद्धतीनंच कागदपत्रं आणि इतर तपशील अपलोड करण्याची पद्धत सुरु करण्याच्या हालचाली म्हाडाकडून सुरू केल्या गेल्याचं कळत आहे. 


सध्याच्या जाहिरातीनुसार म्हाडाच्या घरांच्या किमती 


ठिकाण उत्पन्न गट घरांच्या किमती
अँटॉप हिल          अत्यल्प 41 लाख 51 हजार
वरळी अल्प 2 कोटी 62 लाख 
विक्रोळी  अल्प 67 लाख 13 हजार
मालाड  अल्प 70 लाख 87 हजार
गोरेगाव  मध्यम   1 कोटी 11 लाख 94 हजार
पवई    मध्यम गट       1 कोटी 20 लाख 13 हजार
पवई   उच्च 1 कोटी 78 लाख 71 हजार
अंधेरी उच्च 4 कोटी 87 लाख 
ताडदेव    उच्च   7 कोटी 52 लाख 61 हजार

म्हाडाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या सोडतीमध्ये घरांच्या किमती पाहूनच अर्जदारांना घाम फुटला. ज्यामुळं आता घरांच्या किमती नेमक्या किती प्रमाणात कमी होणार यावर अनेकांचच लक्ष राहील. म्हाडाच्या सध्या सुरु असणाऱ्या सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील घरांच्या किमती तर कोटींच्या पुढे आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी वरळीच्या सस्मिरातील 550 चौरस फुटांच्या फ्लॅटची किंमत 2 कोटी 62 लाख रुपये आहे. घर मिळाल्यास सेवाशुल्क आणि मालमत्ता करही भरणं अपेक्षित असल्यामुळं या किमतीत आणखी भर पडेल.  त्यामुळे नऊ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्यांना हे घरं कसं परवडणार? हाच प्रश्न आहे. म्हाडाच्या घरांच्या किमतींमुळं बँकांकडून गृहकर्ज घेतानासुद्धा विजेत्यांना घाम फुटणार आहे. तेव्हा आता म्हाडाच्या घरांच्या नव्या किमती कशा असतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.